आर्थिक विकासाकरीता स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम योजना माहिती
योजनेचा उद्देश:
राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या उमेदवारांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे.
उद्दिष्ट पूर्तीसाठी खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात येतील.
1. लाभार्थ्यांचे स्वयंरोजगारासाठी निवड आणि प्रशिक्षण.
2. व्यावसायिक उद्योजक तयार करण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्वंकष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
3. या व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी अँप आणि प्रत्यक्ष उद्योग सुरु करण्यासाठी पूरक समन्वय यंत्रणा यांची उभारणी करणे.
4. व्यवसाय सुरु करण्यासाठी संबंधित लाथार्थ्यांकडून पूरक कागदपत्रांची पूर्तता करून घेणे.
5. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी लाभार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाकरता इंटर्नशिप उपलब्ध करून देणे.
6. व्यवसाय सुरु करण्याकरता कर्जाच्या उपलब्धतेसाठी सरकारी योजना, संस्था अगर बँक यांच्याशी समन्वय साधून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत करणे.
7. लाभार्थ्यांच्या व्यवसाय प्रसिद्धीसाठी त्यांना डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देणे.
8. लाभार्थ्याने सुरु केलेल्या व्यवसायाच्या प्रगतीचा तीन महिने मागोवा घेणे आणि या कालावधीत समन्वयातुन त्यांच्या अडचणींचे निरसन करून देणे व व्यवसाय वृध्दी होत असल्याची खात्री करणे.
योजनेचा लक्षगट:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील जातीचे युवक, युवती जे सदर प्रशिक्षणासाठी घेण्यास इच्छुक आहेत असे उमेदवार .