You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.
AMRUT बद्दल

राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक - युवती व इतर उमेदवार इत्यादींचा विकास घडवण्यासाठी Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) 'अमृत' अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाद्वारे केलेली आहे. अमृत या स्वायत्त संस्थेची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत करण्यात आलेली आहे. सदर संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. अमृत या संस्थेच्या योजना Board of Governorsच्या मान्यतेने कार्यान्वित होतात. अमृत संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई हे आहेत. नियामक मंडळाच्या मान्यतेने मंजूर झालेल्या योजना तसेच माननीय व्यवस्थापकीय संचालक अमृत यांना प्राप्त झालेल्या विविध अधिकाराच्या कार्यकक्षेत विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यात येत असतात.

"नेतृत्व करताना सेवक व्हा. निस्वार्थी व्हा. असीम धीर धरा आणि यश तुमचेच आहे."

- स्वामी विवेकानंद

संपर्क माहिती

premium bootstrap themes