You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना

योजनेचा उद्देश:

शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे.

अमृतचा लक्षगट:

    खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार.

    लाभार्थी पात्रता निकष:

      1. अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
      2. अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
      3. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे बंधनकारक राहील.
      4. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी / शुल्काची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती आवश्यक आहे.
      5. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) व रद्द केलेल्या चेकची प्रत जोडावी.

    लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत::

      अमृतच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये अमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेत www.mscepune.in स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्र / दस्तऐवज अपलोड करावेत. अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह स्वस्वाक्षरीत (Self-attested) करून विहित मुदतीत अमृतच्या कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील. योजनेच्या आर्थिक मर्यादेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राप्त होणाऱ्या पात्र उमेदवारांना योजनेचा लाभ देण्यात येईल.

    लाभाचे स्वरूप:

        1. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.६,५००/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
        2. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन (मराठी व हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.५,३००/- (अक्षरी रुपये. पाच हजार तीनशे फक्त)‍ प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
        3. सदर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल.
        4. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.

<