MPSC/UPSC मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी अर्थसहाय्य FAQs
1. अमृत संस्थेमार्फत MPSC/UPSC परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष आहेत ते प्रत्येक योजनेसाठी लागू राहतात. त्याशिवाय MPSC व UPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजनांतर्गत मुख्य परीक्षेच्या लाभासाठी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे आणि मुलाखतीच्या लाभासाठी संबंधित मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
2. एका आर्थिक वर्षात एका उमेदवारास कितीवेळा या योजनांचा लाभ घेता येईल?
या योजनेचा उद्देश लक्षित गटातील पात्र उमेदवारांना MPSC व UPSC आयोगामार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेद्वारा राज्य व केंद्र शासनाच्या सेवेतील तांत्रिक व प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे हा असल्याने एका आर्थिक वर्षात ज्या परीक्षांसाठी अर्जदार पात्र ठरेल त्या परीक्षांसाठी विहित आर्थिक मर्यादेत लाभ अनुज्ञेय राहील.
3. या योजनेसाठी वयोमर्यादा निर्धारित केली आहे का?
होय. या योजनेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) व संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) विविध स्पर्धा परीक्षांसाठी निर्धारित केलेल्या वयोमर्यादा योजनेसाठी आपोआप लागू राहतील.
4. या योजनांतर्गत प्रोत्साहनपर अर्थसहाय्य व्यतिरिक्त इतर कोणती मदत मिळते का?
नाही.
5. अर्जदाराचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र कोणत्या वर्षाचे आवश्यक आहे?
ज्या आर्थिक वर्षात योजनेच्या लाभासाठी अर्ज केला आहे त्या वर्षासाठी उत्पन्नाचे वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.
<