You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

अमृत सॉफ्ट स्किल व संगणक कौशल्य विकास योजना

      १. अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे / दस्तऐवज आवश्यक आहेत?
      ⮚ याबाबत सविस्तर माहिती सर्वसाधारण FAQs मध्ये दिली आहे.
      २. या योजनेसाठी किती प्रशिक्षण मोड्यूल्स लाभार्थ्याने पूर्ण केले पाहिजेत?
      ⮚ या योजनेसाठी किमान पहिले दोन मोड्यूल्स प्रायोजित प्रशिक्षणार्थीस पूर्ण करणे व उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील, त्यानंतरच त्यांचे लाभाचा विचार केला जाईल.
      ⮚ पुढचे दोन अॅडव्हान्स कोर्समोड्यूल्स पहिल्या मोड्यूल्सच्या यशस्वीतेवर अवलंबून राहतील. त्याचे पुर्णत्वा नंतर प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाल्यावर त्यापुढील लाभ अनुज्ञेय राहील.
      ३. या योजनेसाठी लाभाची रक्कम किती असेल?
      ⮚ या योजनांतर्गत लाभार्थीस सुरुवातीस कोणताही थेट आर्थिक लाभ अनुज्ञेय नाही. कोर्स समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थीच्या प्रशिक्षणाचे केवळ शैक्षणिक शुल्क सदर संस्थेस अनुज्ञेय राहील.
      ⮚ शुल्क परतावा रक्कम ही संबंधित संस्थेमार्फत लाभार्थ्याचे आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
      ४. प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील कोठे मिळेल?
      ⮚ संस्थेकडील प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
      ५. अमृतचे लाभार्थी निकष पूर्ण करीत असलेल्या परंतु यापूर्वी सदर संस्थेत कोर्स पूर्ण केला असेल तर लाभाची रक्कम लाभार्थ्याला मिळेल का?
      ⮚ नाही.
      ६. यावर्षी योजनेचा लाभ न मिळाल्यास पुढील वर्षासाठी लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी ठेवली जाते का?
      ⮚ नाही.
      ७. असेच कोर्स दुसऱ्या एखाद्या संस्थेत केल्यास लाभ मिळेल का?
      ⮚ नाही.
      ८. निवड झालेल्या लाभार्थ्यास एका आर्थिक वर्षात अल्पकालावधीचे दोन कोर्स पूर्ण करायचे असल्यास दोन्ही कोर्ससाठी लाभ मिळेल का?
      ⮚ होय.
      ९. अर्जदारास निवड झाल्याचे कसे समजेल?
      ⮚ अमृतच्या www.mahaamrut.org व सदर संस्थेच्या संकेतस्थळावर लाभार्थी यादी प्रसिध्द केली जाईल.

<