योजनेचा उद्देश:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींतील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना युवक-युवतींना संवाद, सूचना कौशल्य, सॉफ्ट स्किल, इंग्रजीसहित इतर प्रमुख भाषांवर प्रभुत्व, आत्मविश्वास वृध्दी व संगणक कौशल्य, याद्वारे व्यक्तीमत्व विकास घडवून उद्योगाभिमुख, रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे.
लाभार्थी लक्षगट:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवार जे सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक असून निर्धारित शैक्षणिक अर्हता धारण करतात असे उमेदवार
योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत:
1. या प्रशिक्षणासाठी अर्जदारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार व आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभा राहील. इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या व संबंधित प्रशिक्षण संस्थेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.2. अमृतच्या योजनेसाठी इच्छुक अर्जदारांनी अमृतच्या लाभार्थी पात्रतेच्या निकषांची पूर्तता करीत असल्याची खात्री करून विहीत नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित संस्थेच्या व अमृतच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. सदर अर्जाची हार्ड कॉपी सर्व आवश्यक कागदपत्र/दस्तऐवजसह अमृतच्या कार्यालयास विहित मुदतीत सादर करावी. 3. आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुरूप प्रत्येक कोर्ससाठी पात्र उमेदवारांची निवड प्रथमत: संबंधित संस्थेकडून केली जाईल. त्यापैकी अमृत संस्थेच्या योजनेसाठी इच्छुक व लाभार्थी पात्रतेच्या निकषांची पूर्तता करीत असलेल्या अर्जदारांची यादी सदर संस्था सर्व आवश्यक कागदपत्र/दस्तऐवजसह अमृतच्या कार्यालयास मान्यतेसाठी सादर करेल.4. अमृत संस्थेच्या छाननी समितीद्वारे सदर संस्थेकडून प्राप्त अर्जदारांच्या प्रस्तावांची छाननी करून व्यवस्थापकीय संचालक, अमृत यांचे मान्यतेने अंतिमत: निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधितांना प्रशिक्षण देण्यासाठी सदर संस्थेकडे पाठविण्यात येईल. 5. याबाबत जाहीरात प्रसिध्दीनंतर योजनेच्या आर्थिक मर्यादेत संस्थेकडून प्राप्त होणाऱ्या यादीनुसार पात्र उमेदवारास प्राधान्य राहील.
लाभार्थी पात्रता निकष:
1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.2. अर्जदार प्रशिक्षण कोर्सनिहाय संस्थांनी निर्धारित केलेली किमान शैक्षणिक / तांत्रिक पदवी / पदविका धारक असणे आवश्यक.3. उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
लाभार्थी निवड प्रक्रिया:
1. अर्जदार खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीचा तरुण/तरुणी इच्छुक नवोद्योजक असणे आवश्यक आहे.2. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख पेक्षा कमी असल्याबाबत प्राधिकृत अधिकारी यांचा उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.3. अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.4. उमेदवाराचे वय ४५ पेक्षा जास्त नसावे.5. अर्जदाराकडे स्वत:ची अशी नवीन व्यावसायिक कल्पना / तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे.6. योजनांतर्गत प्रोत्साहनपर अर्थसहाय्य कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.7. अर्जदाराने याच प्रयोजनासाठी राज्य किंवा केंद्र सरकार यांच्या इतर समकक्ष अन्य कोणत्याही योजनांमधून रु.१० लाख (अक्षरी रुपये दहा लाख फक्त) पेक्षा जास्तीच्या अर्थसहाय्याचा लाभ घेतलेला नसावा.8. उमेदवाराच्या आधार कार्ड व पॅनकार्डची स्वस्वाक्षरीत (Self-attested) प्रत. 9. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा किंवा त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) देणे आवशयक. उमेदवाराने जर त्याच्या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्याचे तपशील दिले असतील तर त्याप्रसंगी कंपनीच्या अन्य निदेशाकांकडून (Cofounders) “ना-हरकत प्रमाणपत्र” देणे बंधनकारक
लाभाचे स्वरूप:
1. या योजनेमध्ये लाभार्थ्यास कोणताही थेट आर्थिक लाभ अनुज्ञेय नाही.2. कोर्ससाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सदर प्रशिक्षण संस्थेच्या नियमांनुसार सुरुवातीस प्रशिक्षण शुल्क व सुरक्षा शुल्क स्वत: भरावयाचे आहे, त्यापैकी केवळ प्रशिक्षण शुल्क लाभासाठी अनुज्ञेय आहे, सुरक्षा शुल्क अनुज्ञेय नाही. 3. योजनेच्या निकषांनुसार लाभासाठी निवड केलेल्या व प्रायोजकत्व प्रदान केलेल्या उमेदवारांनी समाधानकारकरित्या कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रासह लाभार्थी यादी व प्रशिक्षण शुल्क सदर संस्थेकडून अमृतला कळविण्यात येईल. 4. लाभार्थ्यांनी प्रशिक्षण कोर्स समाधानकारकरीत्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संस्थेने अमृत संस्थेला सादर केल्यानंतर त्या कोर्सेसचे मर्यादेत केवळ कोर्सचे शैक्षणिक शुल्क संबंधित प्रशिक्षण संस्थेस अनुज्ञेय राहील. 5. सदर संस्थेने ज्या लाभार्थ्यांना अमृत संस्थेने प्रायोजकत्व दिले आहे त्यांचे आधार संलग्न बँक खात्यात शैक्षणिक शुल्क जमा करावे व लाभार्थ्याचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, जमा केलेली रक्कम याचा तपशील अमृत कार्यालयास तत्काळ सादर करावा.