अमृत - IGTR द्वारे औद्योगिक कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
योजनेचा उद्देश:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख व रोजगारक्षम प्रशिक्षण देणे
अमृतचा लक्षगट:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही
त्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार जे सदर प्रशिक्षणासाठी निश्चित केलेल्या इतर अर्हतासुध्दा पूर्ण करतात
लाभार्थी पात्रता निकष:
1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. 2. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. 3. निवडलेल्या प्रशिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता
अर्ज करण्याची पध्दत:
1. अमृत व इंडो-जर्मन टूल रुम (IGTR) यांचे संयुक्त विद्यमाने योजनेसाठी अर्ज करण्याचे दृष्टीने अमृतचे संकेतस्थळ
www.mahaamrut.org.in/igtr.html
वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील.2. उमेदवारास त्यांच्या अर्हते नुसार व आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभा राहील.3. अर्जदाराने निवडलेल्या कोर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेने निर्धारित केलेले शैक्षणिक व इतर निकष तसेच, अमृतकडील लाभासाठी अर्जदाराने लाभार्थी पात्रता निकषांची पूर्तता करीत असल्याची खात्री करून त्याबाबतचे स्वसाक्षांकित दस्तऐवज अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी स्वस्वाक्षरीत दस्तऐवजसह अमृत संस्थेस विहित मुदतीत पाठवावी.4. पूर्वनिर्धारित समयमर्यादेत प्राप्त परिपूर्ण अर्जांचा प्राप्त क्रमानुसार विचार होईल.
लाभाचे स्वरूप:
या प्रशिक्षण योजने अंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष/थेट लाभ अनुज्ञेय नाही.
अमृतने या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी प्रायोजित केलेल्या लाभार्थींचे प्रशिक्षण शुल्क, निवास व भोजन शुल्क (जेथे लागू आहे तेथे) तसेच,
विमा व वैयक्तिक सुरक्षासाधने (Insurance and Personal Protective Equipments) शुल्क IGTR संस्थेस अदा करण्यात येईल.