You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

C-DAC माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण योजना – प्रश्नावली (FAQ)

      १. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवाराने C-CAT पूर्वचाचणीपरीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का?
      होय.
      २. उमेदवारास C-CAT पूर्वचाचणीपरीक्षेच्या तयारीसाठी लाभ मिळेल का?
      नाही.
      ३. एखाद्या प्रसंगी उमेदवाराने अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास / करू न शकल्यास प्रशिक्षण शुल्क व निवास शुल्क वसूल केले जाईल का?
      या योजनेचा लाभ केवळ अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना लागू आहे, त्यामुळे अशा प्रसंगी संबंधित उमेदवारास लाभ देण्यात येणार नाही.
      ४. C-DAC सारख्या इतर संस्थांमार्फत प्रशिक्षण घेतल्यास त्यास लाभ मिळेल का?
      नाही.
      ५. उमेदवारांसाठी C-DAC संस्थेची काही नियमावली आहे का?
      C-DAC संस्थेच्या नियमांचे / शिस्तीचे पालन करणे उमेदवारास बंधनकारक राहील. त्याचा भंग केल्याने संस्थेने दंडात्मक कार्यवाही केल्यास अथवा निवड रद्द केल्यास असे उमेदवार अमृतच्या लाभास आपोआप अपात्र ठरतील.
      ६. उमेदवारास C-DAC योजनेतील निवड कोर्सशिवाय इतर कोर्ससाठी प्रशिक्षण घ्यायचे असल्यास अमृत कडील योजनेचा मिळेल का?
      नाही. ज्या कोर्सससाठी अमृत संस्थेने प्रायोजकत्व दिले आहे केवळ त्याच कोर्ससाठी लाभ दिला जाईल.
      ७. उमेदवारास C-DAC च्या निवडक कोर्सपैकी एकापेक्षा अधिक अल्पकालीन कोर्स एका वर्षात करायचे असल्यास त्यासाठी लाभ मिळू शकेल का?
      होय, अमृत संस्थेने ज्या कोर्ससाठी प्रायोजकत्व दिले आहे केवळ त्याच कोर्ससाठी लाभ दिला जाईल.
      ८. C-DAC च्या कोर्स पूर्ततेनंतर नोकरी / व्यवसाय यासाठी अमृतचे सहाय्य मिळते का?
      या कोर्सद्वारे उत्तीर्ण उमेदवार संबंधित क्षेत्रात नोकरी व्यवसाय करण्यास सक्षम व्हावेत, हि अपेक्षा आहे. या योजनेत प्लेसमेंटसाठी C-DAC प्रयत्नशील असते.

<