You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

AIIMS, IIT, IIM, IIIT संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजना

योजनेचा उद्देश:

अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना AIIMS, IIT, IIM, IIIT या संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण घेणे सुकर होण्यासाठी अर्थसहाय्य देणे.

योजनेचा लक्षगट: खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थी ज्यांनी AIIMS, IIT, IIM, IIIT या संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे असे उमेदवार.

लाभार्थी निवड निकष:
      1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
      2. अर्जदाराने या योजनेसाठी अर्ज करताना संबंधित संस्थेत प्रवेश मिळालेल्या निवडपत्राची व प्रवेश घ्रेतलेल्या पुराव्याची स्वस्वाक्षरीत प्रत जोडावी
      3. संस्थेच्या ओळख पत्राची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.
      4. संस्थेच्या बोनाफाइड प्रमाणपत्राची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.
      5. प्रतिवर्षी लाभासाठी अर्ज करणे क्रमप्राप्त आहे, त्यासोबत वरील १ ते ४ ची पूर्तता व त्या वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र व उत्तीर्ण झालेल्या निकालपत्राची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करावी.
      6. अर्जदाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल – बँकेचे नाव, शाखा, खाते प्रकार, खाते क्रमांक, IFSC कोड

    अर्ज करण्याची पध्दत:

      योजनेच्या लाभासाठी इच्छुक अर्जदारांनी अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर www.mahaamrut.org.in ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासोबत आवश्यक कागदपत्र/दस्तऐवज अपलोड करावेत. तसेच, अर्जाची हार्डकॉपी स्वाक्षरीत करून त्यासोबत आवश्यक सर्व दस्तऐवज/कागदपत्रे स्वसाक्षांकित करून अमृत कार्यालयास सादर करावी.

    लाभाचे स्वरूप:

        1. या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या शाखेचा संपूर्ण अभ्याक्रम पूर्ण होईपर्यंत रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) प्रति विद्यार्थी प्रति महा प्रमाणे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
        2. प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य लाभाचा कालावधी प्रत्येक शैक्षणिक वर्षातील ११ महिने धरण्यात येईल.
        3. सदर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य रक्कम वर्षातून दोन वेळेस (प्रत्येक सेमिस्टर उत्तीर्ण झाल्यावर एकदा याप्रमाणे) लाभाधारकाच्या खात्यात जमा करण्यात येईल.
        4. एका सत्रासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मिळाल्यानंतर पुढील सत्रासाठी मागणी करताना मागील सत्रात उत्तीर्ण झाल्याच्या पुराव्यासाठी गुणपत्रिकेची (मार्कशीट) स्वसाक्षांकित प्रत जोडावी.

<