You are using an outdated browser. For a faster, safer browsing experience, upgrade for free today.

कृषी उत्पन्न आधारीत उद्योग सुरू करण्याचे प्रशिक्षण योजना

योजनेचा उद्देश: अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना कृषि उत्पन्न आधारित उद्योगासाठी प्रोत्साहन देणे व त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे.

अमृतचा लक्षगट:

    अमृतच्या लक्षित गटातील जातीचे खालील प्रकारातील उमेदवार
    १. एकल शेतकरी, २. शेतकऱ्यांचा गट, ३. शेतकरी उत्पादक संघ, ४. बचत गट,
    ५. सहकारी संस्था, ६. शेती विषयक कृषि उद्योग करण्यास इच्छुक असलेले उमेदवार

    लाभार्थी निकष:

      1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
      2. अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे.
      3. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील अर्जदार वैयक्तिक, शेतकरी उत्पादक संघ (FPO) / स्वयंसहाय्य गट / बचत गट (SHG) अथवा कंपनी / फर्म / सहकारी संस्था
      4. शेतकऱ्यांना प्राधान्य.

      लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत: योजनेसाठी नमूद अटी व शर्ती मध्ये पात्र ठरणारे इच्छुक उमेदवार यांनी विहीत नमुन्यामध्ये या योजनेसाठी अमृत संस्थेने निश्चित केलेल्या एजन्सीकडे / अमृतकडे www.mahaamrut.org.in वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. जाहीरात प्रसिध्दी नंतर प्रथम येणा-यांस प्राधान्य राहील. तथापि, लाभार्थी निवड छाननी समितीच्या अंतिम मान्यतेच्या अधीन राहून असेल.

      लाभार्थी निवड प्रक्रिया:

        प्राप्त अर्जांची अमृतच्या छाननी निकषांनुसार अमृत व्दारा गठीत छाननी समितीव्दारा छाननी करण्यात येईल. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल. मा.व्यवस्थापकीय संचालक, अमृत यांचे मान्यतेने लाभार्थी यादी अंतिम करण्यात येईल.

      योजने अंतर्गत लाभाचे स्वरूप:

        या योजनेत लाभार्थ्यास प्रशिक्षणा शिवाय इतर कोणताही थेट लाभ अनुज्ञेय नाही.  

<