AIIMS, IIT, IIM, IIIT विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजना प्रश्नावली
1. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
अमृत संस्थेकडील योजनेच्या लाभासाठी जे सर्वसाधारण लाभार्थी निकष प्रत्येक योजनेसाठी लागू आहेत तेच लागू राहतात. या योजनेसाठी संबंधित संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुराव्याची स्वसाक्षांकित आवश्यक आहे.
2. एका आर्थिक वर्षात एका उमेदवारास कितीवेळा या योजनेचा लाभ मिळतो?
एका वर्षात दोन सेमिस्टरसाठी म्हणजे वर्षातून दोन हप्त्यात अर्थसहाय्य लाभ अनुज्ञेय राहील.
3. शिक्षणात खंड पडून कालांतराने तेच शिक्षण पुढे सुरु ठेवल्यास योजनेचा लाभ मिळेल का?
या योजनांतर्गत संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत लाभार्थी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा अन्य अपरिहार्य कारणास्तव शिक्षणात खंड पडल्यास, खंडाच्या कालावधीचे अर्थसहाय्य अनुज्ञेय ठरणार नाही. परंतु, तदनंतर संबंधित लाभार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा नियमित शिक्षण पुन्हा सुरु झाल्यानंतर त्यास पुढील सत्राचे अर्थसहाय्य अनुज्ञेय ठरेल.
4. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो का?
होय.
5. लाभार्थी विद्यार्थ्यास एखाद्या वर्षी संस्थेने एटीकेटी स्वरुपात पुढील सेमिस्टर अथवा वर्षात प्रवेश दिल्यास योजनेचा लाभ सुरु राहील का?
होय.
6. सदर योजनेचा लाभ संबंधित संस्थेत प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी लागू राहील?
सदर संस्थेत प्रवेश घेवून शिक्षण घेणाऱ्या सर्व कोर्सेससाठी लाभ अनुज्ञेय राहील.
<